समांतर क्रांती / खानापूर
उच्च न्यायालयाने बदलीचे आदेश दिल्यानंतरही इर्षेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन खानापूरात वर्णी लावून घेतलेल्या तहसीलदार दूंडाप्पा कोमार यांना पुन्हा न्यायालयाने दणका दिला आहे. आता त्यांना पंधरा हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून सदर रक्कम त्यांनी त्यांच्या खिशातून याचिकाकर्त्याला देण्याचे आदेश बजावले आहेत.
बसवराज कुर्तकोटी यांनी त्यांच्या मालमत्तेसंदर्भात निर्णयाला विलंब केल्याबद्दल न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात न्यायालयाने याचिकाकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून तहसीलदार कोमार यांनी 15 हजार द्यावेत, असा आदेश बजावला आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या तातडीच्या बदलीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्यांची बदली झाली होती. पण, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन बदलीला स्थगिती मिळवली. चार दिवसाच्या नागरिकांच्या परवडीनंतर पुन्हा त्यांची वर्णी लागली. पण, आता एकदा न्यायालयाने त्यांना दणका दिला आहे.

प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाला डॉ. वाघमारे यांची सदिच्छा भेट
समांतर क्रांती / खानापूर Dr. Waghmare paid a courtesy visit to the Prabodhankar Thackeray Library. राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाला नुकताच सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले. यावेळी डॉ. वाघमारे यांनी वाचनालयाला पुस्तके भेट दिली. प्रसंगी त्यांनी आजच्या […]