समांतर क्रांती / खानापूर
सुमारे ४ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना निलंबीत करण्यात आले आहे. ८ जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरांसह सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी करून कागदपत्रे जप्त केली होती. प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या उप्तन्नापेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमावल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गायकवाड यांच्याबद्दल अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यांनी अनेक .ठिकाणी गैरमार्गांनी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. खानापूर तालुक्यात सुध्दा त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना धमकावून जमिनी खरेदी केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्याकडे नोंद झाल्या होत्या. त्याची दखल घेत लोकायुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली. गेल्या महिनाभरापासून त्यांच्या मालमत्तांची छाणणी सुरू होती. त्यानंतर आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
२ कोटींचे उत्पन्न; मालमत्ता ५ कोटी ७० लाखांची
समांतर क्रांती / खानापूर एका तहसिलदाराचे उत्पन्न किती असेल? हा सर्वसामान्यांना पडणारा गहन प्रश्न. खानापूरचे निलंबीत तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांचे नोकरीला लागल्यापासूनचे कायदेशीर उत्पन्न २ कोटी ९७ लाखांचे आहे. पण, त्यांच्याकडे लोकायुक्तांना तब्बल ५ कोटी ७० लाख ८२ हजारांची मालमत्ता आढळून आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबीत करण्यात आले असून त्यांना […]