समांतर क्रांती / खानापूर
गणेश विसर्जनावेळी शनिवारी मलप्रभेत बुडालेल्या यडोगा येथील संजय उर्फ शुभंम यल्लाप्पा कुप्पटगिरी (२२) याचा मृतदेह आज सोमवारी (ता.८) बंधाऱ्याजवळ सापडला. गेल्या दोन दिवसांपासून अग्नीशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांनी त्याच्या शोधासाठी प्रयत्न चालविले होते.
शनिवारी (ता. ६) शुभम हा त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गणेश विसर्जनासाठी गेला होता. त्यावेळी तो पाण्यात बुडाला होता. त्यानंतर त्याचा शोध घेतला जात होता. आज सोमवारीदेखील त्याचा शोध घेतला जात असतांना ज्या ठिकाणी तो बुडाला होता. तेथून जवळच त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. मृतदेह पाण्याबाहेर काढून शवचिकित्सा करण्यात येऊन मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.
तीन दिवसांपासून मृतदेह पाण्यात राहिल्याने मृतदेह सडला होता. शुभम हा एकुलता असल्याने मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
हेही वाचा..

२० खून करणारा ‘बिकिनी किलर’ चार्ल्स सोबराज खानापुरात आला होता, तेव्हा..
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर नेटफ्लिक्सवर ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट शिक्षक दिनी प्रदर्शित झाला आणि सगळीकडे पुन्हा एकदा चार्ल्स सोबराज हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चर्चेत आला. त्याला ६ एप्रिल १९८६ साली गोव्यात दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. तेव्हा गोव्याहून मुंबईला नेतांना त्याला खानापुरात आणले होते. तेव्हा त्या घटनेची चर्चा जोरात रंगली होती. तत्पूर्वी, तो खानापुरात एका हॉटेलमध्ये […]