

समांतर क्रांती / खानापूर
# KHANAPUR: The end of life on the last day of the year. सर्वत्र जुन्या वर्षाला निरोप दिला जात असतांनाच वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका तरूणाच्या आयुष्याचा शेवट झाला. ही धक्कादायक घटना खानापूर तालुक्यात घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संरक्षक कठड्याला दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात येथील निंगापूर गल्लीतील सुरज संजय कुंडेकर (२२) ठार झाला असून त्याचा मित्र गणेश बुचडी (२३, रा. दुर्गानर-खानापूर) हा गंभीर जखमी झाला आहे.
समजलेली अधिक माहिती अशी, मयत सुरज आणि जखमी गणेश हे ३१ डिसेंबरची पार्टी आवरून घरी परतत असतांना बेळगाव-खानापूर महामार्गावर प्रभुनगर येथे त्यांच्या दुचकीने संरक्षक कठड्याला धडक दिली. त्यानंतर ते दोघेही दुचाकीसह पुलावरून सेवा रस्त्यावर कोसळले. यात सुरजच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्त्राव झाला. त्याला बेळगाव येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
गणेश बुचडी हादेखील गंभीर जखमी असून त्याच्यावर बेळगाव येथील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. नववर्षाच्या सुरूवातीलाच घडलेल्या या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

हुतात्मादिन गांभीर्याने पाळा; खानापूर तालुका समितीचे आवाहन
समांतर क्रांती / खानापूर हुतात्मादिनी बहुसंख्येने उपस्थित राहा; खानापूर तालुका समितीची बैठक 17 जानेवारी हुतात्मा दिन संदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक छ. शिवस्मारक येथे 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. प्रास्ताविक सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले व बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला दिवंगत समिती कार्यकर्त्यांना […]