
समांतर क्रांती / खानापूर
The height of cruelty: Before murdering his wife, the husband inserted a heated object into her genitals… a shocking sequence of murder. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा क्रुरपणे खून केल्याची घटना मंगळवारी (ता.२०) कापोली येथे उघडकीस आली. या घटनेतील संशयीत आरोपी अविनाश बाळेकुंद्री याने क्रुरतेची परिसीमाच ओलांडल्याचे शवचिकित्सेदरम्यान दिसून आले आहे. हा प्रकार पाहून पोलिस सुध्दा हदरून गेले आहेत.

सोमवारी (ता.१९) रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५.३० पर्यंत अविनाश यांने पत्नी किरण बाळेकुंद्री (वय ३२) हिचा अनन्वीत छळ करून खून केला. किरण हिला खुर्चीला बांधून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर त्याने पाणी गरम करायच्या तप्त विद्यूत कॉईलने तिच्या शरिराला चटके दिले. संपूर्ण शरीर भाजून काढले. त्याचे एवढ्यावरच समाधान झाले नाही. त्याने तप्त कॉईल गुप्तांगात खुपसली. एकंदरच संशयीताने कौर्याची परिसीमाच ओलांडली.

सकाळी बेशुध्दावस्थेत अविनाश याने किरण हिला मंगळवारी खानापूर येथील खासगी दवाखान्यात तिला दाखल केले. पण, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. खूनाचा संशय येऊ नये म्हणून त्याने हृदयघाताने मृत्यू झाल्याचा बनाव केला. पण, अंगावरील जखमांमुळे या घटनेची माहिती नंदगड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अविनाश याला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर उपरोक्त धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अविनाश हा प्रवासी वाहनांचा व्यवसाय करतो. तर पत्नी किरण ही गावातील बसस्थानकावर दुकान सांभाळत होती. गिऱ्हाईकांशी बोलत असल्याने चारित्र्याच्या संशयावरून तो गेल्या चार महिन्यांपासून तिचा छळ करीत होता. सोमवारी रात्रभर त्यांने एकाद्या क्रुरकर्म्यालाही लाजवेल, अशा पध्दतीने छळ करून तिचा खून केला.
संशयाने घेतला बळी, मुले झाली अनाथ
केवळ चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा क्रुरपणे खून केला. पण यामुळे तिची दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. त्यांना नऊ वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षाची मुलगी आहे. आई कायमची गमावलेल्या या मुलांवरील मायेची सावली हरपली. बापही कारागृहात गेल्याने ती अनाथ झाली आहेत.

गुरुवर्य वाय. एन. मजूकर फाउंडेशनच्या कब्बडी स्पर्धा उत्साहात
समांतर क्रांती / खानापूर येळ्ळूर येथील गुरुवर्य वाय. एन. मजूर फाउंडेशन आयोजित कब्बडी स्पर्धा नुकताच चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित कारलगा हायस्कुलच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुलांच्या गटात कारलगा हायस्कुल तर मुलींच्या गटात गणेबैल हायस्कुलचा संघ विजेता ठरला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वाय. एन. मजूकर होते. मार्केटींग सोसायटीचे अध्यक्ष श्रीशैल माटोळी, […]