
समांतर क्रांती / खानापूर
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एसकेटी ०२ या वाघिणीचा संचार चक्क काळी अभयारण्यापर्यंत असतो. या वाघिणी सह्यादद्रीतील वंशवृध्दीची जननी समजले जाते. तिने आतापर्यंत तीन वेळा पिलांना जन्म दिला असल्याचे वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशनच्या सर्व्हेक्षणात आढळून आले असून तीचे बछड्यांचा वावर गोव्यातील म्हादई, खानापुरातील भीमगड आणि दांडेलीतील काळी अभयारण्यात आढळला आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एसकेटी ही वाघिण मुक्तपणे वावरते. सह्याद्री ते काळी अभयारण्य हा तिचा भ्रमणमार्ग आहे. १५ वर्षांच्या या वाघिणीने २०१३, २०१५ आणि २०१७ असे तीनवेळा पिलांना जन्म दिला आहे. ती २०२१ साली गोव्यातील म्हादई अभयारण्यात आढळली होती. त्याच सुमारास चोर्ला महामार्गावर वाघ दिसल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून झळकल्या होत्या. आतापर्यंत तिचे अस्तित्व काळी अभयारण्य व भीमगड अभयारण्यातही स्पष्ट झाले आहे. तिचे बछडे असलेले एसकेटी ०४ आणि एसकेटी ०७ हे वाघ भीमगड किंवा काळी अभयारण्यात असण्याची शक्यता वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशनचे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांनी वर्तविली आहे.
खानापुरातील वाघांची संख्या वाढतेय..
दरम्यान, एसकेटी ०२ चा प्रवास आणि तिच्या पिलांचा अधिवास लक्षात घेता ती म्हादई, भीमगड आणि काळी अभयारण्यातील वाघांच्या वंशवृध्दीस सुध्दा ही वाघिणी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. २०१६ साली सहा वाघ आणि तीन बछडे भीमगड अभयारण्यात आढळले होते, आता ही संख्या १२ हून अधिक झाली आहे.


बिबट्या चक्क रस्त्यावर..
समांतर क्रांती / खानापूर आज शनिवारी (ता.१६) एक बिबट्या चक्क महामार्गावर मुक्तसंचार करतांना आढळला. बराचकाळ तो रस्त्याशेजारी थांबला होता. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला जंगलात हकलले. चोर्ला महामार्गावरील घाटात दुपारी सदर बिबट्या घाटातील रस्त्यावर फिरत होता. यावेळी तेथून जाणाऱ्यांनी वाहने थांबवून अगदी जवळून त्याचे चित्रीकरण केले. त्याची माहिती वनखात्याला देण्यात आल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला जंगलात […]