
समांतर क्रांती / खानापूर
खानापूर- जांबोटी रस्त्यावरील रामगुरवाडी फाट्यावर एलेक्ट्रीकल्स दुकान फोडून अज्ञातांनी सुमारे दीड लाखांचे साहित्य चोरल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे यामध्ये चोरट्यांनी दुकानदाराने दोनच दिवसांपूर्वी खरेदी केलेली मोटर वायडींगची तांब्याची तार चोरल्यामुळे बेळगावातील तांबे चोरीचे लोण खानापूरात पोहचल्याची चर्चा आहे. अलिकडच्या काळात चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली असून पोलिस खात्याने चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

रामगुरवाडी फाट्यावर सागर कोनेरी पार्सेकर याचे समृध्दी इलेक्ट्रीक्स आणि पाण्याच्या मोटारी दुरूस्तीचे दुकान आहे. नागपंचमीच्या आदल्यादिवशी हुबळीहून तांब्याची तार खरेदी केली होती. दरम्यान, त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी ती तार चोरली आहे. तारेची किंमत दीड लाख इतकी होती. चोरीचा एकंदर प्रकार पाहता ही तार खरेदी केल्याची माहिती असलेल्यांनीच ही चोरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदर दुकानाच्या शेजारचा दुकानदार रात्री आकरा वाजेपर्यंत होता, त्यानंतर चोरी झाली असावी, असाही अंदाज वर्तविला जात आहे.
दुकानात इतरही साहित्य होते, मात्र चोरट्यांनी केवळ तांब्याची तार चोरली आहे. यावरून तांबे चोरीचे हे लोण खानापुरातही दाखल झाल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी खानापूर पोलिसांत तक्रार नोंद झाली असून गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहे.


गाव शहरापासून हाकेच्या अंतरावर; विकास मात्र कोसोमैल दूर
समांतर क्रांती / खानापूर खानापूर शहर चारही बाजुनी अफाट पसरले आहे. त्यात नव्या उपनगरांची भर पडत आहे. पण, या उपनगरांची आवस्था दुर्गम खेड्यांहून भयानक आहे. मुलभूत सुविधाच देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, त्यात विकास कुठून होणार? हा प्रश्न आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हलकर्णी या गावाची अशी दूरवसस्था आहे. गावाला अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. […]