
समांतर क्रांती / खानापूर
गेल्या कांही दिवसांपासून कणकुंबी भागात मंदिरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एका पाठोपाठ चोऱ्या होत असल्याने गावकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. पोलिस मात्र केवळ पंचनामा करून वेळ मारून नेत आहेत. चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
महिनाभरापूर्वी चिगुळे येथील मंदिरातील दोन दानपेट्या फोडून चोरट्यांनी रक्कम पळविली होती. ही घटना ताजी असतानाच गुरूवारी चिखले येथील सातेरी केळबाय मंदिरातील दानपेटी फोटून रक्कम चोरल्याची घटना ऊघडडकीस आली आहे. सदर मंदिराचे महिनाभरापूर्वी नुतनीकरण करण्यात आले होते. समोरील दरवाजा तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी दानपेटी तेथेच फोडून रक्कम लंपास केली आहे.
या दोन्ही घटनांचा पोलिसांनी पंचनामा केला असला तरी अद्याप पोलिस खात्याला चोरट्यांचा माग लागलेला नाही. पर्यटनाच्या नावाखाली कणकुंबी परिसरात चोरट्यांचा वावर वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंदिरांच्या पावित्र्याला धोका निर्माण झाल्यामुळे स्थानिकांतून संताप व्यक्त केला जात असून पोलिस खात्याने तात्काळ अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.


संविधानद्रोही कर्नाटक सरकार… प्रशासनही बेदरकार…
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर Karnataka Govt anti-constitutional कानडीकरणाचा वरवंटा गेल्या ७० वर्षांपासून मराठी माणसावरून फिरविल्यानंतरही कर्नाटकी कंडू शमलेला नाही. त्याची प्रचिती सीमावासीय मराठी भाषीकांना वारंवार येत असतेच. त्यातही गेल्या महिनाभरात कानडीकरणाच्या सक्तीने सरकारचा संविधानद्रोह उघडा पाडला आहे; शिवाय प्रशासनाचा बेदरकारपणा सुध्दा चव्हाट्यावर आला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतील पोलिस सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना संविधानीक […]