
समांतर क्रांती / खानापूर
Theft in ten houses in six villages of Khanapur taluka in one night खानापूर तालुक्यातील सावरगाळी, शिंपेवाडी, गुंजी, बरगाव, रामगुरवाडी आणि गणेबैलसह शहरातील दहा घरामध्ये एकाच रात्री चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून पोलिस खातेही चक्रावून गेले आहे. चोरीची पध्दत पाहता ही चोरी आतंरराज्य टोळीकडून घरफोडी झाल्याचा कयास आहे.
गुंजी भागातील सावरगाळी येथील नारायण भेकणे यांच्या घराचे कुपून तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातील कपाटातील रु. १५ लाखांची रोख आणि १६ तोळे सोने चोरट्यांनी लांबविले आहे. त्यांनी जमिन खरेदी करण्यासाठी सदर रक्कम बँकेतून काढली होती. त्यांच्या घरातील सर्वजन बाहेरगावी गेल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आली आहे. तेथील आणखी एका घरात चोरी झाली असून किती ऐवज चोरीला गेला हे स्पष्ट झालेले नाही. त्या घरातील सर्वजण रत्नागिरीला राहतात. तसेच याच भागातील शिंपेवाडी येथे तीन घरांमध्ये चोरी झाली आहे. तर गुंजीतील एक घर फोडले आहे. या घरांमधून रोख रक्कमेसह दागिणे चोरीला गेले आहेत.
खानापूर शहरासह बरगाव आणि गणेबैल येथील घरेही चोरट्यांनी लुटली आहेत. एकाच रात्री झालेल्या घरफोडीच्या घटनांत चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केली असून चोरीनंतर पुन्हा कुलूप लावल्यामुळे चोरी झाल्याचे कुणालाच कळले नाही. एकाच प्रकारे झालेल्या चोरीच्या घटनेमुळे पोलिस खाते चक्रावून गेले असून नागरीकांत प्रचंड खळबळ माजली आहे. सीसी टीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे दिसले. सर्व ठिकाणी श्वानपथकाला पाचारण करून तपासस करण्यात आला. पण, श्वान कांही अंतरावर जाऊन घुटमळले. त्यामुळे तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे. चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; नंदगड भागातील दुसरी घटना
समांतर क्रांती / खानापूर सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी (ता.१३) घडली आहे. नंदगड भागातील सर्पदंशाची ही दुसरी घटना असून याबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ददोन महिन्यांपूर्वी नंदगडातील एका शाळकरी मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला होता. तालुक्यातील हत्तरवाड येथील गणपती नारायण हलसकर (५२) हे शेतात काम करीत असतांना त्यांना सर्पदंश झाला होता. त्यांना […]