समांतर क्रांती / खानापूर
Tree fell on school.. Only luck saved disaster. शाळांमधील समस्यांमुळे आधीच विद्यार्थ्यांची पुरेवाट होत असतांना निसर्गाने सुध्दा प्रताप दाखविण्यास सुरूवात केल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. सोमवारी (ता. २८) नंदगड येथील जेसीएस आवारातील उर्दू शाळेच्या वर्गखोलीवर झाड कोसळल्याची घटना घडली. ही घटना रात्री घडल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला.
नंदगड येथील जेसीएस आवारातील समस्यांमुळे ‘घरचं झालंय थोडं, व्याह्याने धाडलं घोडं’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. आधीच अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या या शाळेच्या आवारात जलनिर्मल योजनेसाठीच्या अतिरेकांने विद्यार्थी त्रस्त आहेत. अशात सोमवारी रात्री उर्दू शाळेच्या एका वर्गखोलीवर झाड कोसळले. सकाळी विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत आल्यानंतर घडला प्रकार निदर्शनास आला. याची माहिती मिळताच क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली.
शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा आणि शाळा आवाराची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. शाळांच्या दुरूस्तीची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्यक्षात हा उशिरा सुचलेला शहाणपणा असल्याची टिका पालकांमधून होत आहे. नुकताच जेसीएस आवारातील समस्याबाबत पालकांनी ग्रा.पं.ला निर्वाणीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांच्या समस्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज असतांना केवळ वरकरणी अश्वासनबाजी केली.


खानापूर-जांबोटी रस्त्यावर इलेक्ट्रीकल्स दुकान फोडले; तांबे चोरीचे लोण खानापूरात..
समांतर क्रांती / खानापूर खानापूर- जांबोटी रस्त्यावरील रामगुरवाडी फाट्यावर एलेक्ट्रीकल्स दुकान फोडून अज्ञातांनी सुमारे दीड लाखांचे साहित्य चोरल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे यामध्ये चोरट्यांनी दुकानदाराने दोनच दिवसांपूर्वी खरेदी केलेली मोटर वायडींगची तांब्याची तार चोरल्यामुळे बेळगावातील तांबे चोरीचे लोण खानापूरात पोहचल्याची चर्चा आहे. अलिकडच्या काळात चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली असून पोलिस खात्याने चोरट्यांचा शोध […]