
समांतर क्रांती / खानापूर
खानापूर येथील विश्वकर्मा मंदिर ट्रस्टच्यावतीने नुकताच सैन्यदलात नियुक्ती झाल्याबद्दल ट्रस्टचे सभासद दीपक सुतार यांचे चिरंजीवर गुरूदास सुतार आणि मॅकेनिकल इंजिनियरिंग अभ्यास क्रमात प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाल्याबद्दल निलेश हणमंत सुतार यांचा त्यांच्या निवासस्थानी सन्मान करण्यात आला.
विश्वकर्मा समाजातील तरूण पारंपारिक व्यवसायावर संक्रांत ओढवल्यामुळे शिक्षणाकडे वळले. त्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती साधत यश संपादन केले. त्याची दखल आपल्या समाजानेच घ्यायला हवी, या उदात्त हेतूने आम्ही या तररूणांचा सत्कार करीत आहोत. त्यांच्याकडून आपल्या समाजातील तरूणांना प्रेरणा मिळावी, हा यामागील उद्देश आहे, असे प्रतिपादन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सुतार यांनी यावेळी केले.
यावेळी शिवानंद सुतार यांनी खानापूर तालुक्यातील विश्वकर्मा समाज बांधवांनी आधुनिकतेची कास धरून आपल्या पाल्यांना शिक्षणाकडे वळवावे. तसेच समाज बांधवांनी संघटीत राहून विकास साधावा, असे आवाहन केले.
निडगल फेब्रिकेशनचे काम करणारे हनमंत सुतार यांचा चिरंजीव निलेश हनुमंत सुतार याने बेळगाव मधील जीआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनियर्स या विभागांमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन विश्वकर्मा समाजाचा नावलौकिक केला. तसेच माणिकवाडी येथील गुरूदास दीपक सुतार याची लष्करात नियुक्ती झाल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष अशोक सुतार, उपाध्यक्ष परशराम सुतार, बाळू सुतार, वासुदेव सुतार, प्रभाकर सुतार, पांडुरंग सुतार, प्रमोद सुतार, यल्लारी सुतार, संतोष बडगे, हनुमंत सुतार, शिवानंद सुतार तसेच निडगल व माणिकवाडी गावातील विश्वकर्मा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन हणमंत सुतार यांनी केले तर आभार डॉ. श्रीनिवास सुतार यांनी आभार मानले.


पश्चिम घाटवासीयांचे स्थलांतर: वरातीमागून घोडे
समांतर क्रांती / खानापूर आम्हाला स्थलांतर करायचेच नाही, पण केंद्र आणि राज्य सरकार आम्हाला सुविधा पुरविण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे आम्ही स्थलांतराचा निर्णय घेतला. आम्हाला सुविधा द्या, आम्ही येथेच राहतो, असे भीमगड अभयारण्यातील वननिवासींनी उपस्थित नेत्यांना सुनावले. या बैठकीला जेमतेम शंभर नागरीक उपस्थित होते. त्यामुळे जरी स्थलांतराला विरोध करण्यात आला तरी खरंच भीमगड अभयारण्यातील जनता […]