
समांतर क्रांती / खानापूर
येथील विश्वकर्मा समाज विकास मंदिर ट्रस्टने शुक्रवारी (ता. ३१) पासून श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सुतार यांनी दिली. या उत्सव कार्यक्रमाला तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी हरी जागराने जयंती उत्सवाला सुरूवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.३१) सकाळी ६ ते ८ अभिषेक आणि महापूजा, सकाळी ८ ते ९ होमवहन, सकाळी १० ते १२.३० किर्तन, १२.३० ते १.३० मान्यवरांचा सत्कार आणि त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
गेल्या २० वर्षांपासून विश्वकर्मा समाजाने संघटीतपणे एकत्र येऊन विश्वकर्मा जयंती साजरी करण्यास सुरूवात केली आहे. २०२२ मध्ये विश्वकर्मा समाज विकास ट्रस्टने निसर्गाच्या सानिध्यात करंबळ क्रॉस येथे सुंदर असे विश्वकर्मा मंदिर उभारले. या ट्रस्टतर्फे समाजातील गरजुंना साहाय्य केले जाते. त्याशिवाय समाजातील तरूणांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जात असल्याने समाज संघटीत होत असल्याचे मत ट्रस्टचे सेक्रेटरी शिवा सुतार (लालवाडी) यांनी व्यक्त केले.
सर्व समाज एकत्र येऊन समाजातील तरूणांना प्रोत्साहीत करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुतार आणि लोहार समाजाने सुध्दा संघटीत होण्याची गरज होती. त्यामुळेच समाजातील जाणकारांनी ट्रस्टची स्थापना केली. या माध्यमातून गरजुंना साहाय्य करण्याबरोबरच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या शासनाकडे मांडल्या जात आहेत. तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो, अशी माहिती यल्लारी सुतार (माणिकवाडी) यांनी दिली.
ट्रस्टने भाषाभेद बाजुला सारून समाजबांधवांना संघटीत करण्याचे कार्य चालविले असल्याने समाज बांधव एकत्र येत आहेत. प्रत्येक अमावस्येला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याने समाज बांधवांना येणाऱ्या अडचणींची माहिती मिळते. त्यावर तोडगा काढला जातो. जे समाज बांधव अजूनही संघटीत झाले नाहीत, त्यांनी संघटनेच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन हणमंत सुतार (कामतगा) यांनी केले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत गुंजीचा तरुण ठार
समांतर क्रांती / खानापूर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गुंजी गावाजवळ शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. अभय दीपक घाडी (20) रा. गुंजी ता. खानापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दुचाकीवर मागे बसला होता. तर दुचाकीस्वार त्याचा मित्र वैभव […]