समांतर क्रांती / सातारा
सातार्यामध्ये जानेवारीत होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नावाची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती. नेमाडे यांनी यापूर्वीच नकार दिला असल्याने विश्वास पाटील यांचे नाव अंतिम होणार असल्याची जोरदार चर्चा होती.
आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत ‘पानिपत’कारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा केली.
साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेत आज रविवारी (ता.१४) सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. ज्यामध्ये रंगनाथ पठारे, विश्वास पाटील , बाळ फोंडके यांची नावे आघाडीवर होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी यांनी काही दिवसांपुर्वी भालचंद्र नेमाडे यांची देखील भेट घेऊन त्यांना अध्यक्षपदासाठी गळ घातली होती. मात्र नेमाडेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. आजच्या बैठकीमध्ये विश्वास पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आले.
साताऱ्यातील ४ थे संमेलन
साताऱ्यात होणारे हे ४ थे संमेलन आहे. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथद्वारे संमेलन सुरू केलेल्या ३ रे संमेलन १९०५ साली राजवाडा पंडित पांडुरंग यांच्या अध्यक्षपदाखाली साताऱ्यात झाले. १९६२ साली न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९१ साली विद्यानिवास सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते. १९९१ साली ६६ वे संमेलनही याच स्टेडियममध्ये झाले होते. आताचे संमेलन ४ दिवस चालणार असून १,२,३ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे होणार आहे
मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध कादंबरीकार
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘पानिपत’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी असून तिच्यातून त्यांनी आपल्या संपादकीय शैलीची एक आगळीवेगळी छाप मराठी वाचकांवर टाकली आहे.
पानिपत – मराठ्यांच्या पानिपतवर झालेल्या पराभवावर ऐतिहासिक कादंबरी
झाडाझडती – राजकारण आणि समाज यामधील संघर्षाचे चित्रण.
सिंहासन – राजकीय सत्तासंघर्षावर आधारित.
चंद्रमुखी – समाजाच्या तळागाळातील वास्तव दाखवणारी प्रेमकहाणी.
महाड़ – अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायावर भाष्य करणारी कादंबरी.
स्मरणगंध – आत्मकथनात्मक आणि चिंतनशील लेखन.

अस्वलाचा हल्ला, संतापाची लाट; सहा महिन्यात तिसरा हल्ला
समांतर क्रांती / खानापूर वारंवार होत असलेल्या अस्वलांच्या हल्ल्याबद्दल पश्चिम भागातील कणकुंबी-चोर्ला परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वनखात्याकडून अस्वलांना अवरले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचंड नाराजी पसरली असून आंदोलनाचा इशारा या भागातून देण्यात आला आहे. सहा महिन्यात तिसरा हल्ला काल रविवारी हुळंद येथील वासुदेव नारायण गावडे यांच्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांच्यावर उपचार सुरू […]