
समांतर क्रांती / घरकूल विशेष
बेळगाव शहरात घर व प्लॉटच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने वृंदावन सिटी प्राइड हा अत्याधुनिक निवासी प्लॉट प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा आज सोमवारी (ता.२६) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाघवडे रोडवरील रंगडोळी बस स्टॉपसमोर शुभारंभ करण्यात आला.
शुभारंभ होण्यापूर्वीच या प्रकल्पातील अर्ध्यापेक्षा अधिक प्लॉट्स बुक झाल्याने नागरिकांचा या प्रकल्पाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विकास बिल्डर्सचे प्रमुख विकास देसाई यांनी दिली. बेळगावपासून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेला हा प्रकल्प केंद्रीय विद्यालय, व्हीटीयू यांच्या अगदी जवळ असून सुवर्णसौध व राजहंस गडाचा नयनरम्य दृश्याचा नजारा गॅलरीतून डोळ्यांचे पारणे फेडतो.

विकास देसाई म्हणाले, खानापूर तालुका व बेळगाव परिसरात विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने 21 प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. यामध्ये खानापूर शहराजवळील नव्या महामार्गावरील शिवनेरी नगर, लैला साखर कारखाना रोडवरील तुळजाभवानी नगर, बल्लोगा क्रॉसवरील रेणुका नगर, नंदगड जुने बसस्थानकाजवळील मोहन नगर, चिगुळे एन्क्लेव्ह (बिडी), लक्ष्मी एन्क्लेव्ह (हलगा रोड हलशी), किणये मेगा प्रोजेक्ट फार्म हाऊस, कणकुंबी जवळील वनराई आदी प्रकल्पांचा समावेश आहे.सध्या राबविण्यात येणारा ‘वृंदावन सिटी प्राइड’ प्रकल्प हा केजीपी मंजूर एन.ए. लेआऊट असून, खानापूर-बेळगाव महामार्गापासून वाघवडे रस्त्यावर अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच वाघवडे गावापासून अर्धा कि.मी., मच्छे गावापासून 2 कि.मी. अंतरावर हा प्रकल्प स्थित आहे. या प्रकल्पाला सर्व कायदेशीर मान्यता मिळाल्याने ग्राहकांसाठी सुरक्षित व विश्वासार्ह गुंतवणुकीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
‘वृंदावन सिटी प्राइड’ प्रकल्पात 30×40 आणि 30×50 आकारात प्लॉट उपलब्ध आहेत. वीजपुरवठा, रुंद व मजबूत रस्ते, गटर व्यवस्था, सुसज्ज व आधुनिक संपूर्ण जल प्रणाली, प्रशस्त उद्यान, पथदिप अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियोजनबद्ध एनए लेआऊटमुळे हा प्रकल्प वास्तव्यास तसेच भविष्यातील गुंतवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे विकास देसाई यांनी नमूद केले.
सध्या प्लॉट बुकिंग सुरू असून, मर्यादित कालावधीसाठी ‘प्लॉट बुक करा आणि मोफत सोन्याचे नाणे मिळवा’ अशी आकर्षक ऑफरही देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्मी झेरॉक्स बिल्डिंग, टाटा शोरूमसमोर, उद्यमबाग बेळगाव येथील विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या मुख्य कार्यालयात इच्छुक ग्राहकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कान्सुली प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील कान्सुली येथील मराठी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष धोंडीबा चौकुळकर होते. प्रारंभी अध्यक्ष धोंडीबा चौकुळकर आणि गावातील जवान यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ग्रा. पं. अध्यक्षा पूजा चाळगोंडे यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले, तर महात्मा गांधी […]