
समांतर क्रांती / नवी दिल्ली
बेळगाव-पणजी महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून काम पूर्ण होण्यापूर्वीच गणेबैल येथे टोल वसुलीला सुरूवात करण्यात आली आहे. त्याबद्दल काल बुधवारी (ता.२३) केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत खुलासा केला. पूर्ण झालेल्या २०.८ कि.मि. रस्त्यासाठी वापरकर्ता शुल्क वसुल केले जात आहे, अशी माहिती त्यांनी भाजपच्या एका खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिली.
कंत्राटदार, लोकांकडून होणारी अतिरिक्त भुयारी मार्ग, नुकसान भरपाईची मागणी आणि वारंवार रस्ता बंद करण्यामुळे महामार्गाचे काम रखडल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव ते गोवा हद्दीपर्यंतच्या महामार्गाचे अंतर ५२ कि.मि. इतके असून त्यापैकी ७१ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला.
कामात दिरंगाई केल्याबद्दल कंत्राटदाराला ३.२ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुढील मार्चपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल. रस्त्याचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी महामार्गाला जोडणारे कांही रस्ते बंद करण्याची विनंती कर्नाटक राज्य सरकारला करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.


रिक्षा पलटी, विद्यार्थी जखमी
समांतर क्रांती / खानापूर दूध वाहतूक करणारी रिक्षा पलटी झाल्याने विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नंदगड येथे घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातातून विद्यार्थी बालबाल बचावले. कापोलीहुन नंदगडला येणारी बस माचीगड येथे नादुरुस्त झाल्याने कॉलेज आणि शाळेला येणारे विद्यार्थी दूध वाहतूक करणाऱ्या रिक्षात चढले. चन्नेवाडी फाट्याजवळ सदर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी झाली. यावेळी […]