
समांतर क्रांती / खानापूर
चोर्ला घाट हा सह्याद्रीच्या कुशीत विसावला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीतील या जैववैविध्यतेसाठी परिपूर्ण परिसरात अनेक दुर्मिळ पशू-पक्षी आणि वनस्पती आढळतात. नुकताच सुर्ला (सुरल) येथील नामदेव गावकर यांना स्कर्ट मशरूम (फॉलस इंडस्टाम) ही दुर्मिळ प्रजातीची आळंबी आढळली असून तिचे छायाचित्र त्यांनी घेतले. #wild life at chorla ghat
चोर्ला घाटातील जैववैधतेचे महत्व अधोरेखीत करणाऱ्या या आळंबीला ‘व्हील्ड लेडी’ असेही म्हणतात. तिच्या भोवती स्कर्टसारखी जाळीदार रचना असते त्यामुळे ही आळंबी स्कर्ट मशरूम म्हणून अधिक परिचीत आहे. आशिया आणि दक्षिण अमेरिका खंडात याचा वापर औषधासाठी केला जातो. चोर्ला घाटातील घनदाट जंगलात ही दुर्मिळ आळंबी गावकर यांना आढळली आहे.
मलबार ट्री-टोड धोक्यात..

चोर्ला घाटात आढळणारा दुर्मिळ बेडूक मलबार ट्री-टोड सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्याच्या सुरूवातील हा बेडूक चोर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. घाटातील कणकुंबी ते केरीपर्यंतच्या रस्त्यावर हा बेडूक अनेक ठिकाणी वाहनांच्या चाकाखाली येऊन गतप्राण होत असल्याच्या घटना वाढल्याने जैववैधता अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमींतून चिंता व्यक्त केली जात आहे. गोवा आणि कर्नाटकातील वन्यजीव खात्याने चोर्ला घाटातील अशा दुर्मिळ जैववैधतचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी वेळीच पाऊले उचलण्याची मागणी व्यक्त होत आहे.

गोकर्ण: गुहेत राहणारी रशियन महिला व मुली काय खात होत्या? धक्कादायक माहिती आली समोर..
समांतर क्रांती / गोकर्ण गोकर्ण येथील रामतिर्थ डोंगरातील एका गुहेत रशियन ४० वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुली आढळल्या आहेत. दरम्यान, घनदाट जंगलातील या गुहेत त्या कशा जिवंत राहिल्या? त्या काय खाऊन जगत होत्या? कशा राहत होत्या? ती महिला गुहेत राहून नक्की काय करीत होती? असे अनेक प्रश्नांनी सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे. शुक्रवारी […]