
समांतर क्रांती / खानापूर
Will Dr. Anjali Nimbalkar announce her position regarding DCC tomorrow? तालुक्यात सध्या अनेक समस्यांनी नागरीक त्रस्त असतांना कोणत्याच पक्षनेत्यांचे याकडे लक्ष नाही. सगळेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांत रमले आहेत. भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर, काँग्रेसचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळ्ळी आणि विद्यमान संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी त्यांच्यापरिने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची भूमिका काय असेल? याची उत्सूकता तालुकावासीयांना लागून राहिलेली आहे.
उद्या शनिवारी (ता.०२) त्या खानापुरात येत असून त्यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करीत बैठकीचे आयोजन त्यांच्या ‘रायगड’ या निवासस्थानी सकाळी ११ वाजता केले आहे. ५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय नेते खासदार राहूल गांधी यांच्या सभेसंदर्भात त्या यावेळी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, त्या जेष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांशी केवळ राहूल गांधी यांच्या बंगळूर भेटीविषयीच चर्चा करणार की जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसंदर्भात चर्चा करून कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याअनुषंघाने उद्या शनिवारची बैठक महत्वाची ठरणार आहे. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर आपली भूमिका स्पष्ट करणार का? याकडे तालुक्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.
नेते कुणाच्या वळचणीला?
काँग्रेसच्या कांही नेत्यांनी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना ‘हात’ दिला आहे. सध्या त्यांचे हे विश्वासू नेते दुसऱ्यांच्याच इनोव्हा गाडीतून तालुक्याचा फेरफटका मारत काँग्रेसींची दिशाभूल करण्याच्या कामात गढून गेले आहेत. त्यामुळे संभ्रमात असलेल्या काँग्रेसजनांना त्यांच्या नेत्या माजी आमदार तथा राष्ट्रीय काँग्रसच्या सचीव डॉ. अंजली निंबाळकर यांची भूमिका काय असणार? याकडे कटाक्ष ठेऊन आहेत.

सेक्स स्कँडल: माजी पंतप्रधान दडवेगौडांच्या नातवाला जन्मठेप
समांतर क्रांती / बंगळूर कर्नाटकात खळबळ उडवून दिलेल्या सेक्स स्कँडलप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ३२ महिलांचे लैंगीक शोत्रण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात काल शुक्रवारी (ता.०१) रोषारोप सिध्द झाला होता. त्यानंतर आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. यावेळी प्रज्वल याने डोळ्यात पाणी आणून आपली […]