
समांतर क्रांती / खानापूर
शेतात फिरायला गेलेल्या तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील इडलहोंड येथे आज गुरुवारी (ता. 7) घडली. दिग्विजय मनोहर जाधव (36) असे या तरुणाचे नाव असून माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांचा तो मामेभाऊ होता.
दिग्विजय हा पिसेदेव पतसंस्थेच्या गर्लगुंजी शाखेत कामाला होता. आज तो शेतात फिरून येतो असे सांगून शेतात गेला. बराच उशीर तो न परतल्याने घरच्यांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली.
अग्निशमक दलाच्या जवानांनी सायंकाळी उशिरा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. खानापूर शासकीय आरोग्य केंद्रात शवचिकित्सा केल्यानंतर रात्री मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या वेब पोर्टलचा निषेध

दरम्यान, सदर घटना घडल्याची खरी माहिती न घेताच येथील एका वेबपोर्टलने खोटी आणि पूर्णतः असत्य बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे मयताच्या कुटुंबियांना नाहक त्रास झाला. त्या पोर्टलचा नागरिकांनी यतेच्छ उद्धार केल्यानंतर बातमी पोर्टलवरून डिलीट करण्याची नामुस्की त्या पोर्टलच्या मालकावर ओढवली. पण, तोपर्यंत बातमी व्हायरल झाली होती आणि मयताच्या कुटुंबियांना सुद्धा त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल त्या ‘आपल्या’ खानापूरातील पोर्टलबद्दल संताप व्यक्त होत आहे..

‘पीकेपीएस’ना २५ लाखांवरून युतीचा खरपूस समाचार; काँग्रेसचा हल्लाबोल
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यातील कृषीपत्तीन संघांना २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा करीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी चालविली आहे. परंतू, त्यांच्या या घोषणेमुळे तालुक्यातील जनतेतून त्यांचे कौतूक होण्याऐवजी टीका केली जात आहे. काँग्रेसने सुध्दा यावरून आमदारांवर हल्लाबोल केला आहे तर सोशल मिडियावर टीकांची झोड उठली आहे. कृषीपत्तीन […]