
समांतर क्रांती / खानापूर
वाद मिटविण्यासाठी मंदिरात होत असलेल्या बैठकीतच पोटावर सपासप वार केल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना येथील गांधीनगर येथे आज रविवारी (३) चारच्या सुमारास घडली. सुरेश तिम्मान्ना बंडीवड्डर (वय ३२) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर चाकू हल्ला करणारा यल्लाप्पा शांताराम बंडीवड्डर (६२) हा स्वत:हून पोलीस स्थानकात हजर झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

गेल्या कांही महिन्यांपासून सुरेश बंडीवड्डर आणि यल्लाप्पा बंडीवड्डर यांच्यात वाद सुरू होता. तो मिटविण्यासाठी त्यांच्या समाजाच्या पंचांची बैठक मंदिरात आयोजीत करण्यात आली होती. दरम्यान, बैठक सुरू असतानाच यल्लाप्पा याने सुरेश याच्या पोटावर सपासप वार केले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मंदिरात रक्ताचा सडा पडला होता. त्याच अवस्थेत त्याला येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. पण, जखम गंभीर होती, त्यामुळे त्याला बेळगावला हलवत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

हल्ला झाला तेव्हा सुरेशला वाचवायला गेलेल्या सागर अष्टेकर याच्या हाताला चाकू लागून तोदेखील जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गवंडी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वातावरण तंग बनल्यामुले तेथे तात्काळ पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चाकू हल्ला करणारा संशयीत आरोपी यल्लाप्पा बंडीवड्डर हा स्वत:हून पोलिस स्थानकात चाकूसह हजर झाला. तो ट्रक चालक असल्याचे समजते.
वाद काय होता? अनैतिक संबंधांची किनार?
सुरेश आणि यल्लाप्पा यांच्यात कोणता वाद होता, याबाबत पोलिसांनी अद्याप कांहीच खुलासा केलेला नसला तरी या प्रकरणाला अनैतिक संबंधांची किनार असल्याची चर्चा गांधीनगर परिसरात सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोण गुंतले आहे, त्याची माहिती पोलिस घेत असल्याचे समजते.


कन्नडसक्ती: युवा म. ए. समिती घेणार खानापूरच्या आमदारांची भेट
समांतर क्रांती / खानापूरमहाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्यावतीने कन्नडसक्ती संदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. आतापर्यंत पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदीश शेट्टर यांच्या भेटी घेऊन निवेदन सादर करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने उद्या सोमवारी (ता. 04) सकाळी ११-०० वाजता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्यात येणार आहे. […]