
समांतर क्रांती / लोंढा
मिरज – लोंढा रेल्वेत अज्ञात चोरट्यांनी तरूणाचा खिसा कापून सुमारे १ लाख ९ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (ता.१४) रात्री घडली. दीपक मड्डी हा बेळगावहून लोंढ्याला येत असतांना त्याच्याकडील ९३०० रुपयांची रोकड आणि रु. १ लाख किमतीचे १० ग्रॅम सोन्याचे नाणे चोरट्यांनी लांबविले आहे.
दीपक हा नेहमीप्रमाणे मिरज – लोंढा पॅसेंजरने येत असतांना त्याला गाढ झोप लागली. लोंढ्यात रेल्वे आल्यानंतरी त्याला जाग आली नाही. तासभराने जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याचा खिसा कापून सदर ऐवज चोरण्यात आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ रेल्वे पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदविली.
चोरट्यांनी चोरी केल्यानंतर दीपक याच्या पाकीटातील कागदपत्रे आणि ओळख पत्र ग्राम पंचायतीच्या आवारात फेकले आहे. त्याच दरम्यान चोरटा तेथून जात असल्याचा प्रसंग सीसी टिव्हीत कैद झाला असून त्यावरून रेल्वे पोलिस चोरट्याचा तपास करीत आहेत.

नाक दाबताच तोंड उघडले, रास्तारोकोनंतर बससेवा सुरळीत करण्याची ग्वाही
समांतर क्रांती / गर्लगुंजी गर्लगुंजी-बेळगाव शटल बससेवा बंद करून गर्लगुंजी ते नंद्दीहळ्ळी-बेळगाव अशी बसफेरी सुरू केल्याने विद्यार्थी आणि नागरीकांची गैरसोय सुरू होती. मंगळवारी संतप्त नागरीकांनी रास्तारोको करीत बस आडविल्याने परिवहन मंडळाला जाग आली आणि तात्काळ बससेवा पूर्ववत करण्याची ग्वाही आगारप्रमुखांनी दिली. गर्लगुंजी ते बेळगाव शटल बससेवा सुरू होती. पण, खासदार जगदीश शेट्टर यांनी नंद्दिहळ्ळीच्या प्रवाशांची […]