समांतर क्रांती / खानापूर
Youth who went for exercise drown in river? व्यायामासाठी गेलेला तरूण मलप्रभेत पोहण्यासाठी उतरल्यानंतर बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याचा शोध घेतला जात आहे. प्रथमेश रविंद्र पाटील (१८) असे या तरूणाचे नाव असून तो लोकोळी येथील आहे.
काल शुक्रवारी सायंकाळी प्रथमेश नेहमीप्रमाणे मलप्रभा काठावर गेला होता. तो पोहत असतांना कांही पाहिले होते. पण, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. त्याची दुचाकी व कपडे मलप्रभेच्या काठावर आढळून आल्याने तो मलप्रभेच्या पात्रात बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खानापूर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर आज शनिवारी मलप्रभा नदीत शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.
प्रथमेश हा लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत होता. परंतु, उंची कमी असल्याने तो पोहण्यास मलप्रभेत जात असे. त्याचे वडील रविंद्र पाटील हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे आपणही लष्करात जावे, अशी इच्छा असणारा प्रथमेश कालपासून बेपत्ता असल्याने खळबळ माजली आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगावात अधिवेशन; वातावरण तापणार?
समांतर क्रांती / बेळगाव Session in Belgaum in the first week of December. आपण मुख्यमंत्रत्र्यांशी चर्चा केली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगावातील सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी हुबळी येथे शनिवारी (ता. २५) पत्रकारांना दिली. आधीच जिल्हा प्रशासनाने काळादिनाला परवानगी नाकरल्यामुळे बेळगावसह सीमाभागात नाराजी पसरली आहे, त्या हिवाळी अधिवेशन […]