
समांतर क्रांती / खानापूर
तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून प्रलंबीत आहेत. २०२१ मध्ये जिल्हा आणि तालुका पंचायत सभागृहांची मुदत संपली होती. त्यानंतर आरक्षण आणि मतदार संघांच्या पूनर्रचनेमुळे निवडणूक रखडली आहे. पावसाळ्यानंत निवडणूक घेतली जाईल, असे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी म्हटले आहे.
बुधवारी झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील ३१ जिल्यातील ११३० आणि २३९ तालुक्यातील ३६७१ मतदार संघात निवडणूक होणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे मंत्री खर्गे यांनी सांगितले. तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुका न झाल्याने विकास कामे ठप्प असून नागरीकांतून संताप व्यक्त केला जात आहे.


कोल्ड्रींक समजून झुरळांचे औषध पिल्याने चिमुकलीचा मृत्यू
समांतर क्रांती / बेळगाव कोल्ड्रीकच्या बाटलीतील झुरळ मारण्याचे औषध पिल्याने अडीच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना बेळगावातील आझमनगरात घडली आहे. मरीयम अकिलअहमद तल्लूर असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव असून या घटनेत जुनेशा नामक मुलगी अत्यव्यस्थ आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मरीयम ही शेजाऱ्यांच्या घरात खेळण्यासाठी गेली होती. ती जुनेशासोबत खेळत असतांना त्यांना कोल्ड्रीकची बाटली दिसली. […]