
समांतर क्रांती / खानापूर
शहरापासून जवळच असलेल्या होनकल येथून तरूण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडीलांनी खानापूर पोलिसांत नोंदविली आहे. राजू बसाप्पा हणबरहट्टी (वय ३२) असे या तरूणाचे नाव असून तो मुळचा गोकाक तालुक्यातील अंकेतंगीनहाळ येथील रहिवासी आहे. सध्या तो होनकल येथील विठ्ठल झुंजवाडकर यांच्या शेतात राहत होता, तेथून तो ०६ जून रोजी बेपत्ता झाला असल्याचे त्याच्या वडीलांनी तक्रारीत म्हटले आहे. त्याला केवळ कानडी भाषा समजते. फोटोतील तरूण आढळल्यास खानापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार साहेब, तालुक्यात हे काय चाललंय?
समांतर क्रांती / खानापूर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभा निवडणुकीत तालुक्यात शटल बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. तालुक्यात शटल बससेवा तर सुरू झालीच नाही; त्याउलट बसअभावी विद्यार्थ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. त्यामुळे आमदार साहेब, तालुक्यात हे काय चाललंय? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. येथील बस आगर समस्यांचे आगर बनले आहे. […]