समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
स्थलांतराची भिती दाखवून भीमगड अभयारण्यातील शेतजमिनी लाटण्याचा धंदा सध्या तेजीत आहे. गवाळी येथील जमिनींच्या प्रकरणाबाबत ‘समांतर क्रांती’ने आवाज उठविल्यानंतर आता भु-माफीयांचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. कुष्णापूर येथील १५० एकर जमिन भु-माफीयांनी आवघ्या कांही लाखात लाटली आहे.
कुष्णापुरातील बहुतेक सुशिक्षीत तरूण गावाबाहेर असतात, त्याचाच गैरफायदा घेत भू-माफीयांनी तेथील अशिक्षित नागरीकांच्या सह्या घेऊन जमिन आपल्या ताब्यात घेतली आहे. नागरीकांना केवळ एक लाख रुपये देऊन त्यांची घोर फसवणूक करण्यात आली आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याची माहिती एका स्थानिकाने ‘समांतर क्रांती’शी बोलतांना दिली.
सदर प्रकरणात खानापूर तालुक्यातील दलाल गुंतले असून त्यांना तहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वरदहस्त लाभला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
कागदपत्रांवर घेतले आंगठे..
गावातील बहुतेकांना सह्या करता येत नसल्याचे लक्षात घेऊन कागदपत्रांवर त्यांचे आगठे घेण्यात आले आहेत. प्रत्यक्षात त्यांना हे आंगठे कशासाठी घेतले याची पुसटशी कल्पनादेखील देण्यात आलेली नाही. कांही लोक नेहमी कुष्णापुरात जातात. त्यांनीच हा जमिन घोटाळा घडवून आणल्याचे समजते.

कचराच कचरा चोहीकडे, गेले नगरसेवक कुणीकडे?
समांतर क्रांती / खानापूर खानापूर शहर म्हणजे कचऱ्याचे आगार बनले आहे. शहराच्या प्रमुख चौकांसह उपनगरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पण, याकडे लक्ष द्यायला नगरसेवक आणि नगर पंचायत प्रशासनाला वेळच नाही. कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती, पण ती मोहीमही तकलादू ठरली आहे. शहरातील बसस्थानकासमोर मांगरीश हॉलच्या बाजुला परिसरातील दुकानदार बिनदिक्कत कचरा टाकत […]