समांतर क्रांती / लोंढा
Five kg of ganja seized at Londa railway station; one arrested. लोंढा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी मोठी कारवाई करीत पाच किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून पोलिसांनी रेल्वेस्थानकावर अचानक कारवाई केली. यावेळी झारखंड येथील परशूराम मॅथ्यू याला अटक करून त्याच्याकडून ५५ हजार ९१० रुपये किमतीचा पाच किलो ५९१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. बेळगाव रेल्वे स्थानकात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंढ्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लोंढ्यातून गोव्याकडे तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गवाळीतील शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी आवस्थेत...

शाळेच्या मैदानावर मृतदेह आढळला, पुढे काय झाले?
समांतर क्रांती / खानापूर शाळेच्या आवारात एकाचा मृतदेह आढळून आल्याने काही काळ खळबळ माजली होती. पण, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पालकांनी निःश्वास सोडला. ही घटना घडली रामनगर येथे. सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वाकला गेलेल्याना शाळेच्या मैदानावर मृतदेह दिसला. तातडीने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तात्काळ हालचाली करून मृतदेहाची ओळख पटविली. सदर व्यक्ती […]